घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली
नंदुरबार l प्रतिनिधी-
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची भावना जागविण्यासाठी नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संसदरत्न माजी खा. डॉ. हिना गावित आणि भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीत तिरंगा ध्वज हातात घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रॅलीमुळे घोटाणे गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, नगरसेविका रेखा चौधरी, नगरसेविका शोभा चौधरी, नगरसेविका नीता मराठे, नगरसेवक पंकज चौधरी, भाजपा नेते अविनाश माळी, सरपंच सचिन धनगर, माजी जि. प. सदस्य सागर तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील, सरपंच लोटन पाटील, उपसरपंच डॉ. मनोज गिरासे, सरपंच राजू मराठे, सरपंच शरद पाटील, सरपंच व्यंकट पाटील, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मराठे, सतीश मराठे, ॲड. प्रकाश भोई, दीपक चौधरी, भूषण सोनार, विकी मराठे, आकाश कडोसे, जगदीश पाटील, रवींद्र गोसावी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करावा, तसेच देशाच्या एकता व अखंडतेचा संदेश जनमानसात पोहोचवावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रॅलीला मोठा प्रतिसाद दिला.










