Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक कोटींचे बायोडिझेलसह तीन टँकर जप्त, तिघांना अटक

team by team
August 11, 2026
in Uncategorized
0
एक कोटींचे बायोडिझेलसह तीन टँकर जप्त, तिघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

गुजरात राज्यातून विसरवाडीमार्गे धुळ्याकडे तब्बल १ लाख २८ हजार लिटर बायोडिझेलची अवैध वाहतूक करणारे तीन टँकर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले. या कारवाईत तीन टँकर चालकांना ताब्यात घेण्यात आले असून, १ कोटी २ लाख ४० हजार रुपये किमतीचे बायोडिझेल, १ कोटी १५ लाख २० हजार रुपये किमतीचे तीन टँकर आणि ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण २ कोटी १७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत गुजरात राज्यातून विसरवाडीमार्गे बायोडिझेलची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ सापळा लावला. रात्री साडेअकराच्या सुमारास विसरवाडीच्या दिशेने धुळ्याकडे एकापाठोपाठ येणारे पांढऱ्या रंगाचे तीन टँकर पोलिसांना दिसले. पोलिसांनी तिन्ही टँकर थांबवून चालकांकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे वाहनांची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान टँकरमध्ये बायोडिझेल असल्याचा संशय आल्याने पुरवठा विभाग, नवापूर आणि नंदुरबार येथील फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्यात तिन्ही टँकरमधून बायोडिझेलची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी टँकर चालक बाबुलाल नरसिंगराम बिष्णोई (४९, रा. भूनिया, ता. सेंडवा, जि. बाडमेर, राजस्थान), गुमानराम रुपाराम जाट (३८, रा. दिनगड, ता. चौथान, जि. बाडमेर, राजस्थान) आणि संतोष रोधेश्याम सिंग (३६, रा. पुरा हरलाल, ता. बाह, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जयेश खलाने करीत आहेत.

ही कारवाई जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार मुकेश तावडे, मोहन ढमढेरे, तसेच पोलीस अंमलदार रामेश्वर चव्हाण, अभय राजपुत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि रविंद्र अहिरे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नांदर्खे येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा

Next Post

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

Next Post
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add