Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

team by team
July 17, 2026
in शैक्षणिक
0
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी-

राणीपूर ता धडगाव येथे आयसीएआर-एनबीपीजीआर (ICAR-NBPGR), नवी दिल्ली यांच्या वतीने ‘ट्रायबल सब प्लॅन’ (TSP) योजनेअंतर्गत राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ (वनस्पती जनुकीय संसाधने) जागरूकता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.
कार्यक्रमाचा उद्देश व साधनसामग्री वाटप: वनस्पती जनुकीय संसाधनांच्या संवर्धनाबाबत शेतकरी वर्गात जागरूकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या अंतर्गत शेतकऱ्यांना मका, ज्वारी आणि भात यांसारख्या प्रमुख पिकांचे सुधारित बियाणे, तसेच कृषी महाविद्यालयाच्या रोपवाटिकेत तयार केलेली आंबा व लिंबू या फळपिकांची रोपे, जैविक कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, शेतीची कामे अधिक सुलभ व्हावीत, या हेतूने शेतकऱ्यांना लहान शेती अवजारांचेही वितरण करण्यात आले.

शाश्वत व सेंद्रिय शेतीचे महत्त्व: प्रशिक्षण कार्यक्रमात केवळ पिकांच्या सुधारित वाणांवरच नव्हे, तर ‘शाश्वत व सेंद्रिय शेती’ या विषयावर विशेष भर देण्यात आला. रसायनांचा अतिवापर टाळून जमिनीचा पोत सुधारणे, नैसर्गिक खतांचा वापर आणि जैविक कीड नियंत्रण याद्वारे शेती कशी फायदेशीर करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शाश्वत शेती ही काळाची गरज असून, त्यातूनच दीर्घकालीन उत्पादकता आणि पर्यावरण रक्षण शक्य असल्याचे प्रतिपादन तज्ज्ञांनी केले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन: प्रशिक्षण कार्यक्रमात शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार येथील सहयोगी प्राध्यापक, उद्यानविद्या डॉ. दीपककुमार अहिरे आणि सहाय्यक प्राध्यापक, कृषी विस्तार डॉ. दिनेश सूर्यवंशी यांनी संसाधन व्यक्ती (Resource Person) म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृषी-उद्यान पिके, रोपवाटिका व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी मोलाची माहिती दिली.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: या कार्यक्रमासाठी राणीपूर परिसरातील आदिवासी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पीउपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे नियोजन आयसीएआर-एनबीपीजीआर, नवी दिल्ली येथील टीएसपी कार्यक्रम समन्वयक आणि वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. पंकज कुमार कन्नौजिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लक्ष्मीकांत भामरे (कृषी सहाय्यक, उद्यानविद्या) आणि शासकीय कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

Next Post

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

Next Post
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add