श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी-
“योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समन्वय साधणारी भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी होय.” या उदात्त विचाराचा जागर करत का. वि. प्र. संस्था, भालेर संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जि. प.च्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, भा. ज. प चे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, भालेरच्या माजी सरपंच सौ. कविता पाटील, योग शिक्षक विनोद सैंदाणे, दीपक सोनवणे, भिका पाटील, बी. के. पाटील, देविदास पाटील, भगवान पाटील, हर्षल पाटील, फकीरा पाटील, वासुदेव पाटील यांच्यासह भा. ज. प. चे पदाधिकारी, पालकवर्ग आणि पंचक्रोशीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
योग शिक्षक विनोद सैंदाणे यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि जीवन सकारात्मक बनते, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षिका एस. पी. पाटील सह माजी क्रीडा शिक्षक एस.एस. पाटील यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य पी.एस.सूर्यवंशी आणि पर्यवेक्षक पी.डी.पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.









