नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत माजी खा.डॉ. हिना गावित यांनी संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत झालेल्या विकासाची वाटचाल, कार्य, उपलब्धी आणि भविष्यातील दिशा या संदर्भाने सविस्तर माहिती सादर केली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सह संघटक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक सेवक संघाचे राष्ट्रीय प्रचारक व्ही.सतिषजी, डॉ. गजाननजी डांगे, डॉ.हेमंत सावरा यांच्यासह मान्यवर खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ उपस्थित होते.
संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या प्रयत्नातून नंदुरबार तालुक्यातील नटावद आणि लगतच्या दहा गावांमध्ये संसदीय संकुल विकास परियोजना राबवली जात आहे. त्या अंतर्गत दहा गावांमधील शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, फर्म बंडिंग, नाला खोलीकरण, विविध फळे भाज्या लागवड करणे, महिलांच्या सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगार देणारे उपक्रम राबवले जात असून दिनांक 18 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत डॉक्टर हिनाताई गावित यांनी सविस्तर माहिती दिली. आदिवासी भागातील विकास कार्य या माध्यमातून व्यापक होत असल्याबद्दल उपस्थित वरिष्ठांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.









