नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी बोर्ड) परीक्षेचा निकालात सैनिकी विद्यालयाचा यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
इयत्ता दहावीक्या प्रथम बॅचपासूनच सैनिकी शाळेने राबवलेल्या ‘विशेष सैनिकी पॅटर्ननुसार’ दरवर्षी विद्यार्थी घवघवीत यश संपादित करत असून याही वर्षी घवघवीत यश संपादित करत शाळेच्या शंभर टक्के निकाल लागला आहे.
शाळेत प्रथम आलेला विद्यार्थी दिग्विजय शरद पाटील यास ९१.८०% गुण मिळाले. द्वितीय क्रमांक विनय अर्जुन सूर्यवंशी ८७.८० %, तृतीय क्रमांक मुकुंदराज दिनेश परमार ८६.६०%, दुर्गेश सोपानदेव ठाकरे ८६.४०%मिळवून चौथा ,तर रोशन जंगलसिंग पाडवी ८६.००% याचा पाचवा क्रमांक आला.
आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे राजेंद्रकुमार गावित, संचालिका ईला गावित, सचिव डॉ. विभूती गावित ,सचिव मा. ऋषिका गावित, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच सैनिकी विद्यालयाने राबवलेल्या’ विशेष सैनिकी पॅटर्न’ चे कौतुक करत शाळेचे प्राचार्य शरद बागुल व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
अभिनव उपक्रम.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केले अभिनंदन..
शाळेचा यशस्वी निकालाचे मानकरी असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी प्राचार्य शरद बागुल, भानुदास वळवी, उमाकांत पाटील, संदीप ईशी,श्री रवींद्र पाडवी यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. याबाबत पालकांनीही आनंद व्यक्त करत शाळा तसेच शिक्षकांबद्दल समाधान व्यक्त केले.








