Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

team by team
May 8, 2026
in आरोग्य
0
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

नंदुरबार l प्रतिनिधी-

रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे प्रथमच अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान करण्यात आले असून संबंधित रुग्णासाठी आवश्यक रक्तघटक उपलब्ध करून देण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. ही कामगिरी जिल्हा रुग्णालयासाठी अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद मानली जात आहे.

‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगटांपैकी एक असून वैद्यकीय भाषेत त्याला ‘एचएच रक्तगट’ असे संबोधले जाते. सामान्यतः A, B, AB आणि O या रक्तगटांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा ‘H Antigen’ हा घटक या रक्तगटात पूर्णतः अनुपस्थित असतो. त्यामुळे हा रक्तगट इतर रक्तगटांपेक्षा वेगळा ठरतो. भारतात साधारण दहा हजार व्यक्तींमागे एका व्यक्तीत हा रक्तगट आढळतो. विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात तो तुलनेने अधिक प्रमाणात आढळून येतो.

या रक्तगटाच्या व्यक्तींना केवळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चेच रक्त देता येते. चुकीने ‘O’ रक्तगट समजून रक्त दिल्यास गंभीर प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे अचूक तपासणी व योग्य निदान करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.

सदर रुग्ण हे पोस्ट गंगापूर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील असून या दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करणे ही मोठी आव्हानात्मक प्रक्रिया होती. मालेगाव येथील रक्तदाता साजिद अन्सारी तसेच रक्तदाता समूहातील अस्लम शेख अन्सारी व एजाज अहमद यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. रक्तदाता शोध मोहिमेत विक्रम यादव, चोपडा येथील दीपक दादा जैन व नंदुरबार येथील राकेश चौधरी यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

मालेगाव रक्त केंद्राचे संचालक कैलास सोनवणे व अधिकारी-कर्मचारी वृंद यांनी रक्त संकलनासाठी विशेष सहकार्य केले. तसेच वाहनचालक विनय वळवी, रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी जयेश सोनवणे व प्रीतम मेंथेवाड यांनी तत्परतेने त्याच रात्री उशिरापर्यंत ‘बॉम्बे ब्लड’ची बॅग नंदुरबार रक्त केंद्रात पोहोचवून सकाळी रुग्णाला रक्त देण्यासाठी आवश्यक ‘क्रॉस मॅच’ व इतर चाचण्या पूर्ण केल्या.

दरम्यान, रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे सन २०२५ मध्ये सहा हजारांहून अधिक रक्तसंकलन करून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडीकर व रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्रीतम मेंथेवाड यांनी या निदान प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली.

या उल्लेखनीय कार्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add