नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांना पण टंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नातून नंदुरबार तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींना पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 10 ग्रामपंचायतींना संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्हिडिओ कॉल द्वारे टँकरची पाहणी केली तसेच ग्रामस्थांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, डॉक्टर हिना गावित यांनी संबोधित करताना सांगितले की, पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासन प्रशासन स्तरावर आपण सातत्याने प्रयत्नशिल राहून पाठपुरावा करीत राहणार आहे. नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील बलवंड होळ तर्फे रनाळे वैंदाने आसाने मांजरे रजाळे खोंडामळी कोळदा शनिमांडळ या गावांना पाण्याचे टँकर वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, माजी जिल्हा परिषद सागर तांबोळी, वैंदाने उपसरपंच मनोज गिरासे, होळ सरपंच व्यंकट पाटील, आसाने सरपंच शरद पाटील, न्याहली उपसरपंच ए. बी.पाटील, घोटाने सरपंच सचिन धनगर, बलवंड सरपंच संजय पाटील, मांजरे उपसरपंच दगा कोळी, कंढरे सरपंच लोटन पाटील आदी उपस्थित होते.








