Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

team by team
March 27, 2026
in राजकीय
0
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

नंदुरबार l प्रतिनिधी

‘जय श्रीराम’चा जयघोष, ढोल-ताशांचा गजरात आणि भक्तीमय वातावरणात नंदुरबार शहरात रघुवंशी समाजाच्या वतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी तरुणांनी ढोल-ताशांच्या तालावर आणि डीजेवरील श्रीरामांच्या गीतांवर नृत्य करत जल्लोष साजरा केला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रघुवंशी समाजाच्या वतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेच्या प्रारंभी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.

*असा होता शोभायात्रेचा मार्ग*

परदेशीपुरा येथील श्रीराम मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. तेथून आमदार कार्यालय, जुनी नगरपालिका चौक, परदेशीपुरा, अंधारे चौक या मार्गाने मार्गक्रमण करत शोभायात्रा पुन्हा श्रीराम मंदिरात विसर्जित झाली. या संपूर्ण मार्गावर रघुवंशी समाजाचे बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*श्रीराम जन्मोत्सव*

दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाच्या वेळी ‘सियावर रामचंद्र की जय’च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात मोठी गर्दी केली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

Next Post

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

Next Post
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

नंदुरबार शासकीय कृषी महाविद्यालयात अळंबी लागवड तंत्रज्ञानावर एकदिवसीय प्रशिक्षण

March 27, 2026
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ : विदेशात यश मिळवलेल्या सुपुत्राचा भव्य सत्कार

March 27, 2026
रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित  शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

रघूवंशी समाजाच्यावतीने आयोजित शिबीरात, ७१ रक्त़दात्यांनी केले रक्तदान

March 27, 2026
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

March 27, 2026
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add