Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

team by team
March 19, 2026
in राजकीय
0
आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तथा ‘संसद रत्न’ डॉ. हिना गावित यांनी शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करत साकडं घातलं.

 

आ. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत दोन महिन्यांपूर्वी हृदयविकारामळे बिघाड झाला होता. त्यावरील उपचार चालू असल्यामुळे मुंबई येथील रुग्णालयात काही आठवड्यांपासून दाखल आहेत.

पूर्वीपेक्षा आता प्रकृतीत सुधार होत असून सर्व प्रकारच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असल्याचे गावित परिवाराकडून सांगण्यात आले आहे. तथापि पूर्वीप्रमाणे ते कार्यरत व्हावेत यासाठी त्यांचे सर्व हितचिंतक प्रार्थना करीत असून त्यांच्या भेटीची प्रतीक्षा करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ हिना गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ येथे जाऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान श्री शनि देवाच्या मंदिरात विधिवत पूजन केले. तसेच डॉ.विजयकुमार गावित यांच्या उत्तम आरोग्यासाठी श्री.शनि देवाच्या चरणी साकडे घातले. शनी मंदिराचे पुजारी तथा प्रसिद्ध पुरोहित पांढारकर गुरुजी यांनी मंत्रोच्चार केले.

याप्रसंगी शनी महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष दिलीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, हिम्मत पाटील, महेंद्र पाटील, भटू धनगर, महेंद्र राजपूत, चिंधू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच गुजरात राज्यातील डेडीयापाडा येथे वसलेले आदिवासींचे कुलदैवत देव मोगरा माता मंदिरात जाऊन डॉ. हिना गावित यांनी पारंपरिक विधीनुसार देव मोगरा मातेचे पूजन केले होते व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीचरणी प्रार्थना केली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

Next Post

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

Next Post
रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

रामनामाचा जयघोषात रघुवंशी समाजाचा वतीने शोभायात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add