Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

team by team
March 7, 2026
in आरोग्य
0
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

नंदुरबार  l प्रतिनिधी-

महिला दिनानिमित्त नंदुरबार येथील स्पर्श हॉस्पिटल तर्फे ८ मार्च रोजी एक हजार महिलांना मासिक पाळी कप (मेंस्ट्रुअल कप) मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. प्रीती ठाकरे यांनी दिली.

नंदुरबार येथील स्पर्श हॉस्पिटल तर्फे दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यापूर्वी या दिवशी महिलांची मोफत प्रसूती सेवा, तसेच मोफत सॅनिटरी पॅड वाटप अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही ही परंपरा कायम ठेवत महिलांच्या आरोग्य व पर्यावरण जनजागृतीसाठी मासिक पाळी कपचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

मासिक पाळी कप हा पर्यावरणपूरक पर्याय असून तो सिलिकॉनपासून बनविलेला असतो आणि पुन्हा पुन्हा वापरता येतो. त्यामुळे दर महिन्याला सॅनिटरी पॅड खरेदी करण्याचा खर्च वाचतो. तसेच सॅनिटरी पॅड जमिनीत विघटन होण्यासाठी बराच कालावधी लागतो, त्यामुळे पर्यावरणावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. मासिक पाळी कप वापरल्यास हा कचरा मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असेही डॉ. ठाकरे यांनी सांगितले.

त्यांच्या मते, एक मासिक पाळी कप साधारण पाच ते दहा वर्षे वापरता येतो, त्यामुळे महिलांची आर्थिक बचतही होते. कप योग्य पद्धतीने वापरल्यास गळती होण्याची शक्यता कमी असते, तसेच तो सहा ते बारा तास वापरता येतो, त्यामुळे वारंवार बदलण्याची गरज भासत नाही. मेडिकल दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेला असल्यामुळे तो सुरक्षित व आरामदायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कप वापरल्यास झोपणे, प्रवास करणे, व्यायाम करणे किंवा पोहणे यांसारखी दैनंदिन कामे सहज करता येतात. तसेच तो रक्त हवेशी संपर्कात येऊ देत नसल्यामुळे वास येण्याची शक्यता कमी होते आणि शरीरातील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो.

दरम्यान, योग्य साईज व मार्गदर्शन मिळाल्यास कुमारी मुलींसाठीही मासिक पाळी कप वापरणे शक्य आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.

मासिक पाळी कप वापरण्याचे फायदे

पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणारा,सहा ते बारा तास सतत वापरता येतो, पाच ते दहा वर्षे टिकतो, त्यामुळे खर्चात बचत,गळती व वास कमी होण्यास मदत, सुरक्षित व आरामदायक वापर, व्यायाम, प्रवास व पोहणे सहज शक्य, शरीराचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

Next Post

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

Next Post
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add