Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

team by team
February 18, 2026
in क्राईम
0
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

नंदुरबार l प्रतिनिधी-

पवनऊर्जा प्रकल्पातून कॉपर केबल चोरी करून पसार होणाऱ्या तिघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली. चौकशीदरम्यान एका संशयिताने पोलिसांच्या डोळ्यात मिरची स्प्रे फवारून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्यालाही जेरबंद केले. ही घटना सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) काळमदेव–शनिमांडळ रस्त्यावर घडली.

नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांना शनिमांडळ ते काळमदेव मार्गावरून पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरी करून काही जण पळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिमांडळ गावाच्या पुढे सापळा रचण्यात आला. दरम्यान एमएच १८ बीझेड ३१३७ क्रमांकाचे वाहन येताना दिसल्याने ते थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनातील शकिल लतीफ खाटीक (३९) व युनुस शहा हमीद शहा फकीर (३४), दोघेही रा. दोंडाईचा, जि. धुळे, यांच्याकडे कॉपर केबल व वजन काटा आढळून आला.

आधी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून चौकशी केली असता, त्यांच्या मागून येणाऱ्या चारचाकी वाहनात आणखी एक इसम असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी संबंधित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून त्याला अडविण्यात आले असता त्याने पोलिसांच्या डोळ्यात मिरची स्प्रे फवारला. तरीही पोलिसांनी धैर्याने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याची ओळख मेहबूब लुकमान पिंजारी (३९), रा. दोंडाईचा, जि. धुळे अशी पटली. त्याचे एमएच ०४ एफए १८५२ क्रमांकाचे वाहनही जप्त करण्यात आले.

या प्रकरणी शकिल लतीफ खाटीक, युनुस शहा हमीद शहा फकीर आणि मेहबूब लुकमान पिंजारी यांच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही वाहने, ४६७ किलो कॉपर वायर, तीन मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ८ लाख १५ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे व उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलिस उपनिरीक्षक सुनील भामरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मोतीराम भामरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, सचिन सैंदाणे व अरुण चव्हाण यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

Next Post

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

Next Post
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add