Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

team by team
February 15, 2026
in शैक्षणिक
0
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

नंदुरबार l प्रतिनिधी-

पालकांचा सन्मान आणि कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व जपणे ही काळाची गरज आहे. मातृ-पितृ चरणी नतमस्तक होणे म्हणजेच जीवनातील यशाचा खरा पाया मजबूत करणे होय असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील यांनी केले.

भालेर येथील का. वि. प्र. सं. संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी रोजी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

संस्कारांचा आदर्श वस्तुपाठ
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय प्रेरणादायी पद्धतीने झाली. मुख्याध्यापक पी. एस. सूर्यवंशी व पर्यवेक्षक पी. डी. पाटील यांनी स्वतःच्या वडिलांचे विधिवत चरणप्रक्षालन करून पूजन केले. या कृतीतून त्यांनी विद्यार्थ्यांसमोर संस्कारांचा जिवंत आदर्श उभा केला. त्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या माता-पित्यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी संपूर्ण परिसर “आई-वडील हेच खरे दैवत” या भावनेने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच बेबीताई पाटील, देविदास पाटील, शरदराव सूर्यवंशी, शहाणाभाऊ धनगर, भालेरच्या सरपंच कविता पाटील
यांची विशेष उपस्थिती होती. तसेच शिंदगव्हाण, भालेर, नगाव, तिसी, निंभेल, काकरदे या परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावनिक सादरीकरण
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांवरील अभंग, भावगीते आणि काव्यपंक्ती सादर केल्या. पालकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांचे कंठ दाटून आले, तर मुलांच्या प्रेमळ कृतीने पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.
हेमंत नामदेव माळी, भूषण हिम्मत पाटील, विजय प्रकाश सोनवणे यांच्यासह सौ. भिकूबाई भिल, सुवर्णा पाटील, भारती पाटील, संगीता पाटील, मनीषा पाटील यांसह अनेक माता-पालक भगिनींनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
प्रास्ताविक सी. व्ही. पाटील यांनी तर सूत्रसंचालन व्ही. इशी यांनी केले. मुख्याध्यापक पी. एस. सूर्यवंशी व पर्यवेक्षक पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add