नंदुरबार l प्रतिनिधी
मागील पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीत बंजारा बांधवांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील संधी देण्यात आली होती.बंजारा समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करून न्याय देऊ असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
शहरातील दंडपाणेश्वर रस्त्यावरील पांजरपोळ गो शाळा परिसरात संत सेवालाल महाराज, संत रामजी नाईक मंदिराचे भूमिपूजन शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंदिराच्या बांधकामासाठी पालिकेकडून ५ लाखांच्या निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.श्री १००८ श्रीमंत तारादास बापू महाराज यांचा हस्ते विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी आ. चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून १२१ महादेवांची मंदिरे बांधण्यात आले. सेवालाल महाराज मंदिर बनवण्यासाठी मालिकेच्या माध्यमातून ५ लाखांच्या निधी देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला रोहीदास राठोड, प्रल्हाद राठोड, तेजस पवार, छोटू राठोड,दिलीप राठोड, लक्ष्मण सूर्यवंशी,गणेश चव्हाण, दिवान पाटील, रवी चव्हाण ,देशमुख पवार,राजू राठोड, मिलीन जाधव ,रवी पवार, जयसिंग पवार आदी उपस्थीत होते .








