Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

team by team
February 2, 2026
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व.अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. सर्वसामान्यांपासून राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातून त्यांच्या जाण्याबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात असताना उद्या मंगळवार दि.३ फेब्रुवारी रोजी त्यांचा अस्थिकलश नंदुरबार येथे दाखल होणार आहे.

स्व.अजितदादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांसाठी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात, (गिरीविहार गेट समोर,नंदुरबार) येथे व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी व चाहत्यांना दर्शन घेता येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी दिली आहे.

स्व.अजितदादा पवार हे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी चळवळीचा कणा होते. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी, स्पष्टवक्तेपणा आणि जनहितासाठीची त्यांची भूमिका यामुळे सर्वत्र आपला ठसा उमटविला होता. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

अजितदादा यांचा अस्थिकलश नंदुरबारात दाखल होणार असल्याने जिल्ह्यातील वातावरण शोकमय झाले असून अनेक कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. यासंदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी नागरिकांनी शांतता व शिस्त पाळून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. स्व.अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या नंदुरबारमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

Next Post

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

Next Post
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add