नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतीय 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, श्याम वाडकर, ज्ञानेश्वर पाटील, कल्पना ठुबे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहीणी चव्हाण,आदि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. सेठी यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.








