नंदुरबार l प्रतिनिधी-
दिल्ली येथे झालेल्या १२व्या राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत भालेर ता.नंदुरबार येथील जिल्ह्यातील ११ वर्ष वयोगटातील निखिल विनोद पाटील (५१ किलो) याने दिल्ली येथे झालेल्या १२व्या राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत रौप्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन होत आहे.
खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत नऊ खेळाडूंनी सहभाग घेत एक सुवर्ण, तीन रौप्य व पाच कांस्य पदकांची कमाई केली. काथे व कुमिते प्रकारात त्यांनी महाराष्ट्राचे व नंदुरबारचे जिल्ह्याचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. विजेत्यांना देवेंद्र कोर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देण्यात आले. या यशासाठी प्रशिक्षक डॉ. दिनेश बैसाणे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.








