नंदुरबार l प्रतिनिधी-
येथे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५-२६ नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे दिनांक २६ ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्याभरात १० वेगवेगळया केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड.आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
नंदुरबार केंद्रावरील बालनाट्य स्पर्धेत दिनांक २६ जानेवारी ते दिनांक २८ जानेवारी २०२६ दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील विविध विद्यालयातील १९ बालनाट्य छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सादर होणार आहेत. सातत्याने २१ वर्ष चालणारी ही बालनाट्य स्पर्धा आहे. प्रत्येक दिवसाला सहा ते सात बालनाट्याचे प्रयोग होणार आहेत.
दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी २.०० वाजता – ‘म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे’ (नगरपरिषद नंदुरबार संचलित, लोकमान्य टिळक विद्यालय नंदुरबार), दुपारी ३.१५ वाजता – ‘धरती रंग संग बेरंगी’ (स्वा.सै.श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्या मंदिर, नंदुरबार), सायं.४.३० वाजता – ‘छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे?’ (कमला नेहरू कन्या विद्यालय, स्टेशन रोड, नंदुरबार), सायं. ५.४५ वाजता- ‘जय हो फॅन्टसी’ (श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार), संध्या.७.०० वाजता – ’आम्ही नाटक करीत आहोत’ (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार ता. जि.नंदुरबार), रात्री ८.१५ वाजता – स्वराची कहाणी (गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे, ता. जि. नंदुरबार), दिनांक २७ जानेवारी रोजी – सकाळी १० वाजता – ’वासुदेव आला रे’ (जि.प. प्राथमिक शाळा खुषगव्हाण ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार), सकाळी ११.१५ वाजता – ’ढ नावाची आधुनिकता’ (हस्ती गुरुकुल दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे), दुपारी १२.३० वाजता – ’मदर्स डे’ (सरस्वती सेवा संस्था, शहादा, ता.शहादा जि.नंदुरबार), दुपारी १.४५ वाजता – ’दुष्काळ’ (प्राचार्य भाई साहेब गो.हू.महाजन (न्यू हायस्कूल) तळोदा ता.तळोदा जि. नंदुरबार), दुपारी ३.०० वाजता- ’सू सु’ (सातपुडा शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था सारंगखेडा ता.शहादा जि.नंदुरबा) सायंकाळी ४.१५ वाजता – ’बदलू आम्ही गोष्टीला’ (हस्ती वर्ल्ड स्कूल दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे), सायंकाळी ५.३० वाजता – ’द बटरफ्लाय’ (श्री सातपुडा विद्यालय लोणखेडा ता.शहादा जि.नंदुरबार) दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता- ’नातं’ (के डी गावित संचलित कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तर्हावद ता.तळोदा जि.नंदुरबार), सकाळी ११.१५ वाजता ’वारी’ (के.डी.गावीत सैनिकी विद्यालय व के.डी.गावीत इंग्लिश मेडीयम स्कूल, पथराई,ता.जि.नंदुरबार), दुपारी १२.३० वाजता- ’गणपती बाप्पा हाजिर हो’ (हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे), दुपारी १.४५ वाजता – ’करामती पोरं’ (हित बहुद्देशीय संस्था, शहादा, ता.शहादा जि.नंदुरबार), दुपारी ०३ वाजता – ’पुष्पक विमान’ (श्रीमती प्र.अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम.व्होरा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर जि. नंदुरबार), सायंकाळी ४.१५ वाजता – ’बदलू आम्ही गोष्टीला’ (नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा ता.तळोदा जि.नंदुरबार) या बालनाट्याचे सादरीकरण होणार आहे.
सदर बालनाट्य बघण्यासाठीचा प्रवेश मोफत असून आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील बालकलावंतांची कला पाहण्यास व त्यांना दाद देण्यास जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केंद्र समन्वयक हर्षल महिरे, सहसमन्वयक आशिष खैरनार, हेमंत पेंढारकर, सागर कदम आदींनी केले आहे.








