Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘कोविड 19’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत

team by team
October 20, 2021
in आरोग्य
0
कोविड- 19’ नियमांचे पालन करून बंदिवान भेटू शकतील नातेवाईक व वकिलांना
नंदुरबार l प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘कोविड 19’ या साथरोगामुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एस.डी.आर.एफ ) मधून 50 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य  देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री या समितीच्या अध्यक्षा आहेत.
           ‘कोविड-19’ मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा नातेवाईकाला अर्थसहाय्याबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक हे प्राप्त तक्रारींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेवून समितीकडे सादर करतील. ‘कोविड-19’ मृत्यूच्या प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास सदर व्यक्तीची समितीकडे तक्रार दाखल करुन घेणे, ‘कोविड-19’ मृत्यूसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मृत्यू कोविड 19 मुळेच झाल्याचे स्पष्ट करणे, संबंधित रुग्णाला ज्या रुग्णालयात दाखल केले गेले आणि उपचार दिले गेले, त्या रुग्णालयाचे आवश्यकतेनुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्या मार्फत किंवा रुग्णालयाकडून कागदपत्रांची पडताळणी करणे.
           नोंदणी प्राधिकरण तक्रार निवारण समितीच्या निर्देशानुसार मृत्यू प्रमाणपत्राला मान्यता तसेच सुधारणा करणे, तक्रार निवारण समितीत मृत रुग्णाच्या समकालीन वैद्यकीय नोंदींची तपासणी करुन समितीकडे दाखल तक्रारी अर्जावर समिती 30 दिवसांच्या आत निर्णय घेईल. जर समितीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने नसेल, तर त्याचे स्पष्ट कारण समितीमार्फत कळविण्यात येईल. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक (मेडिसिन विभाग) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार हे समितीत सदस्य असतील, तर जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव असतील.
बातमी शेअर करा
Previous Post

‘कोविड-19’ मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्य देणार : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची माहिती

Next Post

मनसेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची पुनश्चः नियुक्ती

Next Post
मनसेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची पुनश्चः नियुक्ती

मनसेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी विजय चौधरी यांची पुनश्चः नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add