नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नवनियुक्त नगरसेवकांसह संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना भावपूर्ण अभिवादन केले.
नंदुरबार शहरातील आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्रतिमा पजनाचा कार्यक्रम करण्यात आला. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थित त्यांनी भावपूर्ण अभिवादन केले. याप्रसंगी संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित, नवनियुक्त नगरसेवक तथा विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी, माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, नवनियुक्त नगरसेवक पंकज चौधरी, आकाश चौधरी, माणिक माळी, संजय सोनार, नरेश कांकरिया, योगेश पाटील, दीपक चौधरी, केतन रघुवंशी, प्रकाश भोई, जितेंद्र पाटील आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








