नंदुरबार l महेश पाटील
नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे नाताळ सणाचे औचित्य साधून 2025 ह्या वर्षाचा “नाताळ सांस्कृतिक कार्यक्रम” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनिष पाडवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यानंतर रेव्ह.अनुप वळवी यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मार्था अक्का सुतार, कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, व्हाईस चेअरमन हर्षानंद कालू, एस.ए.शिरसाठ, डॉ.राजेश वसावे, इडा जयनर,एलिया जयनर, रूथ जयनर आदी उपस्थित होते या मान्यवरांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनलकुमार वळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना नाताळ निमित्त शुभेच्छा संदेश दिला.
रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम
मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमात महिला शिक्षिकांनी ख्रिसमसची गाणी सादर केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर केले:
नाताळ गीते: इ.५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी फेलिझ नविनाद,येशू राजा आया,’मेरी ख्रिसमस’ आणि ‘आया मसिहा’, खुशियों की लहर आयी है, संसार की ज्योती येशू है, आला हो आला नाताळ आला, या गाण्यांवर सुंदर सादरीकरण केले.
नाटिका: ‘Tablo ख्रिस्त जन्मोत्सव देखावा’ या संगीत नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
नृत्य आविष्कार: ८ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘देशभक्तिपर गीत’ आणि ‘शेतकरी नृत्य’ सादर केले. मोठ्या गटातील इ ११ वी १२ वी’ च्या विद्यार्थ्यांनी ‘घूमर रिमिक्स’, ‘लावणी रिमिक्स’ आणि ‘ख्रिसमस रिमिक्स’ गाण्यांवर ठेका धरला.
कार्यक्रमाचे आकर्षण
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण म्हणजे वेशभूषा धारण करून आलेला सांताक्लोज. प्रभू येशू ख्रिस्ताचे जन्म देखावे करणारे पुतळे व सजावट.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पाडवी यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याध्यापक विजय पवार यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले.








