Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात कोल्ड्रिफ सिरप’ वापरण्यावर बंदी, जनतेला आणि विक्रेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना

team by team
October 11, 2025
in आरोग्य
0
जिल्ह्यात कोल्ड्रिफ सिरप’ वापरण्यावर बंदी, जनतेला आणि विक्रेत्यांना दिल्या तातडीच्या सूचना

नंदुरबार l प्रतिनिधी-

मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कफ सिरपच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना निदर्शनास आल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एका विशिष्ट बॅचच्या ‘कोल्ड्रिफ सिरप’चा वापर तत्काळ थांबवण्याबाबत आणि त्याचा साठा विक्रीस न ठेवता वेगळा करण्याबाबत जनतेला आणि विक्रेत्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त अश्विनी जमादार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

कोल्ड्रिफ सिरप, समूह क्रःएि आर 13 (Coldrif Syrup, Batch No. SR-१३) निर्मिती दिनांक मे 2025, कालबाह्यता दिनांक एप्रिल 2027, हे औषध मे. खेसन फर्मा, कांचीपुरम जिल्हा, तामिळनाडू (Seram Pharma, Sunguvarchathiram, Kancheepuram District, Tamil Nadu) यांच्याद्वारे उत्पादन केलेले असुन त्यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol – DEG) हा विषारी घटक मिळालेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता यांनी तत्काळ या औषधाचा वापर थांबवावा. जर हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार कार्यालयास त्वरित कळवावे. सर्व औषध विक्रेते (Medical Stores), औषध वितरक (Distributors) तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सदर Coldrif Syrup, Batch No. SR-१३ चा साठा विक्रीस न ठेवता त्वरित वेगळा करून ठेवावा व संबंधित स्थानिक कार्यालयास माहिती द्यावी. सदर औषधाचा राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथील अधिकारी तामिळनाडू, औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना सदर औषधाच्या बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो सर्व साठा गोठवावा अश्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही सहायक आयुक्‍त श्रीमती जमादार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नमस्कार कॉलनीतील 1 कोटीच्या सामाजिक सभागृह व डोम बांधकामाचे आ. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

येणारी निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची; कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे : आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add