Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने कृषी विस्तार कार्यक्रम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

team by team
October 3, 2025
in राज्य
0
शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने कृषी विस्तार कार्यक्रम राबवा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यात कृषी विकासासाठी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने कृषी विस्तार कार्यक्रम राबवावेत. यामुळे शेतकऱ्यांचे संघटन होऊन बाजारव्यवस्थेत त्यांना हक्काची जागा मिळेल आणि जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.

 

 

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची सभा संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

 

या वेळी जिल्हास्तरीय कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेच्या योजनेतून स्थापन झालेल्या कंपन्यांचे संचालक व सचिव” उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक “आत्मा” चे सदस्य सचिव दिपक पटेल यांनी केले.

 

यावेळी डॉ. मित्ताली सेठी यांनी शेतकरी गट आणि कंपन्यांचा खरीप हंगामातील पिक नियोजनात समावेश करून प्रात्यक्षिके, शेतीशाळा, प्रशिक्षणे आणि अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात तृणधान्याखाली मोठे क्षेत्र असल्याने बाजारपेठ विकसित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठी संधी आहे. मध्यवर्ती स्वयंपाकगृहे, झोमॅटो आदी संस्थांना भगर, राळा, नाचणी यांची मोठी आवश्यकता असल्याने बाजारजोडणीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मायनर मिलेट्स, हैद्राबाद” या राष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

जिल्ह्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान आणि परंपरागत कृषी विकास योजना राबविल्या जात आहेत. याबाबतचा आढावा प्रकल्प संचालकांनी सादर केला. रब्बी हंगामात राळा, अर्धख्योतर, ओवा पिकांचे नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणे व शेतीशाळांचे आयोजन होणार आहे. अझोला आणि चारा यांची प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार आहेत. तसेच पशुसंवर्धन विभाग आणि माविम यांच्या समन्वयाने दुध संकलन व विपणन व्यवस्था विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

 

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषिनिविष्ठा व्यवसायासाठी पुढाकार घेऊन भागधारकांना योग्य किमतीत आणि वेळेत पुरवठा करण्याची गरज आहे. यासाठी महाबीज, एनएससी व राज्य कृषी उत्पादक कंपन्यांची डीलरशिप देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रयत्न करतील, असे निर्देश मा. अध्यक्षांनी दिले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील मृदा चाचणीसाठी सध्या २७ हजार माती नमुने घेतले जात असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे यांनी दिली. तसेच नाबार्डमार्फत सोयाबीनआधारित खाद्य उत्पादने तयार करण्यासाठी महिला गटांना विशेष प्रशिक्षण देऊन प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे जिल्हा उपप्रबंधक, नाबार्ड यांनी सांगितले.
यावेळी शेतकरी कंपन्यांच्या संचालकांनी आपापल्या अडचणी मांडल्या तसेच मूल्यवर्धनासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली आणि मा. अध्यक्षांचे आभार मानले. “१० हजार शेतकरी उत्पादक कंपनी” स्थापनेच्या योजनेत स्थापन झालेल्या कंपन्यांनी व्यवसाय प्रगतीचे सादरीकरणही केले.
सभेच्या शेवटी प्रकल्प उपसंचालक मंगेश पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांची साजरी

Next Post
महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांची साजरी

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विविध कार्यक्रमांची साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add