शिवसेना संपर्कप्रमुख,आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते शिवण नदीचे जलपूजन
नंदुरबार l प्रतिनिधी
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील शिवण नदीवरील विरचक प्रकल्पाचा पाणी पातळीत अलीकडेच वाढ झाल्याने शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली.
नंदुरबार शहरासह परिसरात अपेक्षेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली होती.ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सिंचन प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या झराळी येथील शिवण नदीवरील विरचक प्रकल्पाचा पाणीसाठा सध्या ९६.५६ टक्के असून,पुढील कालावधीत भेडसवणाऱ्या पाण्याच्या प्रश्न सुटला आहे. रविवारी सकाळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते रविवारी जलपूजन करण्यात येऊन नदीला साडीचोळी अर्पण करण्यात आली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक परवेज खान, अशोक राजपूत,रवींद्र पवार,विलास रघुवंशी, रोशन कुरेशी, प्रेम सोनार, प्रीतम ढंडोरे,गजेंद्र शिंपी,विजय माळी, संजय अग्रवाल,वरत्या पाडवी,रियाज कुरेशी,फरीद मिस्तरी, मोहितसिंग राजपूत,राकेश खलाणे,निंबा माळी, किरण चौधरी,श्रीराम मोडक,हरून हलवाई आदी उपस्थित होते.