यशासाठी वेळेचे नियोजन आणि कठोर परिश्रमाची जोड आवश्यक : डॉ. शिरीष शिंदे
नंदुरबार l प्रतिनिधी-
यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम, योग्य वेळेचे नियोजन व व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन डॉ. शिरीष शिंदे यांनी नंदुरबार धुळे मराठा समाज उन्नती मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गुणवंत सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले.
नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ व जिल्हा युवा उन्नती मंडळातर्फे शनिवारी शहरालगत असलेल्या गुरुकुलमधील लिंबाई भवनात गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यात सर्वप्रथम महाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून केले.व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मराठा समाजातील दिवंगत लोकांना शांती पाठाने आदरांजली वाहून सुरूवात करण्यात आली सर्व प्रथम प्रा.संजय मराठे लिखित पुस्तकाचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर १८० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
यात दहावी बारावी पदवी आणि विविध क्षेत्रात नोकरी मिळवणाऱ्या तरुण-तरुणी तसेच निवृत्त शिक्षक पदोन्नती मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार पांडुरंग गोरे होते तर प्रमख वक्ते म्हणून डॉ. शिरीष शिंदे होते. व्यासपिठावर राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस संतोष साळुंके, माजी नगरसेवक विजय मराठे, गुलाब मराठे, कृ.ऊ.बा.सभापती दिपक मराठे,सुरत ट्रस्टचे अध्यक्ष धनराज घेवारे,पत्रकार दिलीप शेळके, पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष शांतीलाल गायकवाड, सहसचिव संजय उगले,संचालक ब्रिजलाल चव्हाण, भगवान मोगल, चुडामन मराठे,जितेंद्र खांडवे,नवनीत शिंदे, प्रल्हाद मराठे, महेंद्र गाडे,हरीष हराळ ,शिरीष जगदाळे, पुष्पाताई बोराणे,जिल्हा युवक अध्यक्ष भूषण चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र भवर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक उपाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. डॉ. शिंदे म्हणाले, “आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचे अचूक नियोजन करणे आवश्यक आहे. दररोजच्या कामांची टू-डू लिस्ट तयार करून त्यानुसार नियोजन केल्यास वेळेचा योग्य वापर होतो. ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्यांनी दररोज एक तासापेक्षा जास्त अभ्यास केला, तर ते कधीच मागे राहणार नाहीत. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाइलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. मोबाइलचा वापर कमी करून अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास यशाची उंची गाठणे शक्य आहे,” असे सांगत डॉ. शिरीष शिंदे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लक्ष्मण मोरे, सुभाष शिंदे , सुनिल चव्हाण, भगवान बोराणे, राजेंद्र मोगल,हर्षल गमे, अक्षय उगले, जितेंद्र गागरे, प्रविण चव्हाण, नरेश कदमबांडे, संदीप पेटकर, राहुल घेवारे, आनंदराव पवार राजेंद्र मोगल,दिगंबर चव्हाण, कल्पेश तनपुरे, वैभव जगन्नाथ चव्हाण, वैभव राजेंद्र चव्हाण, मयूर चव्हाण, लोकंश जाधव, सुनिल गांगुर्डे,नितीन मोगल, मुकेश मोगल, प्रमोद मराठे, दिलीप शिंदे, राकेश तनपुरे, गणेश शिंदे, हरीश काळुंगे, राज चव्हाण, जिग्नेश सुर्यवंशी, भूषण गमे, किरण चव्हाण, आदि तळवे , प्रतापपूर, मोड,धमडाई, उमर्दे खुर्दे, दहिंदुले ,येथील युवक मराठा समाज उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे, चंद्रकांत बोराणे व सुनिता शिंदे यांनी केले. तर आभार उन्नती मंडळाचे सचिव अनिल वायकर यांनी मानले या कार्यक्रमाला मराठा समाजातील महिला ,पुरुष,युवा युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते