Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लायन्स क्‍लब नंदुरबारच्या सेवा सप्‍ताहाची सांगता, आरोग्य शिबीर, रक्तदान,व यूवा मार्गदर्शन वर्गाला प्रतिसाद

team by team
October 19, 2021
in सामाजिक
0
लायन्स क्‍लब नंदुरबारच्या सेवा सप्‍ताहाची सांगता, आरोग्य शिबीर, रक्तदान,व यूवा मार्गदर्शन वर्गाला प्रतिसाद

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार l प्रतिनिधी

लायन्स क्‍लब नंदुरबारच्या सेवा सप्‍ताहाची सांगता झाली. यात आरोग्य शिबीर, रक्तदान,व यूवा मार्गदर्शन वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले.लायन्स क्बलच्या सेवा सप्ताहात विविध उपक्रम यशस्‍वीपणे घेण्यात आले.

त्यात कोविडबाबत जनजागृती अंतर्गत डॉ. राजकुमार पाटील यांचे कोविड बाबत घ्‍यावयाची काळजी व उपचार याविषयी व्याख्यान आयोजित केले होते. सदर कार्यक्रमात शंभर लोकांना मास्कचे वितरण करण्यात आले.म.गांधी जयंती निमित्त म.गांधी यांच्‍या पूतळयास माल्यार्पण करून शहरातील जी.टी.पाटील महाविदयालयाच्‍या आवाराची साफसफाई करण्यात आली.जिल्‍हा रूग्‍णालयात रूग्‍ण व त्यांच्या २५० नातेवाईकांना अन्न-दान’ करण्‍यात आले.रक्तदानाचे महत्व यूवा वर्गाला कळावे यासाठी एनसीसी कॅम्प मध्ये डॉ.अर्जून लालचंदानी यांचे व्याख्यान तसेच चॅरिटी बिगीन्स एट होम या उक्ती प्रमाणे लायन्स सदस्यांनी कॅम्‍पमध्‍ये प्रथम रक्तदान करून कॅडेटसला आव्हान केले.त्याला प्रतिसाद म्हणून एकुण १९ कॅडेटसनी प्रथमच रक्तदान केले.पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी व वृक्षांचे महत्व लक्षात घेवून एनसीसी मैदानावर २० वृक्षांची लागवड व संवर्धन लायन्स परिवारांतर्फे करण्यात येणार आहे, तालूक्यातील खोडामळी येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन लायन्स क्‍लबद्वारे करण्यात आले, यात लायन्स परिवारातील विविध तज्ञ डॉक्टरांनी गावकऱ्यांची मोफत तपासणी केली. तसेच काही रूंग्‍णाना पूढील शस्त्रक्रिया व उपचार हे अंत्यत कमी खर्चात करून देण्‍याचे आश्वासन दिले. यात डॉ.राजकुमार पाटील,डॉ.वृषाली पाटील,डॉ.सी.डी.महाजन, डॉ.राकेश पटेल, डॉ.अनिल शाह,डॉ.विजय पटेल, डॉ.तेजल चौधरी, तसेच स्मित हॉस्‍पीटलच्या तज्ञ डॉक्‍टर टीमने रक्तदाब, मधूमेहसह,जनरल तपासणी,डोळे, हाड,व दातांविषयी,तसेच महिला बाबतच्‍या महत्वपूर्ण तपासण्‍या करून रूग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार केले.वरील सेवा सप्ताहात लायन्सचे अध्यक्ष शेखर कोतवाल, सचिव राहूल पाटील व लायन्स सदस्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरी चा बेस्ट क्लब गोल्ड अवॉर्ड ने सन्मान, एकूण 13 पुरस्कारांसह नागसेन पेंढारकर यांना बेस्ट प्रेसिडेंट गोल्ड अवॉर्ड

Next Post

नंदुरबारच्या कमलेश चौधरींना उपस्थितीच्या मान, आ.रोहित पवारांची संकल्पना; जगातील उंच भगव्या ध्वजाची प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add