Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा;विविध रुग्णालयांना भेट देऊन पाहणी

team by team
September 12, 2025
in राजकीय
0
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा;विविध रुग्णालयांना भेट देऊन पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच तरंगता दवाखान्यांना भेट देवून सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयांची स्थिती, औषध पुरवठा, स्वच्छता तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार आमश्या पाडवी, आरोग्य उपसंचालक (नाशिक विभाग) डॉ. कपील आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

*अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय*
अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन माननीय मंत्री महोदयांनी सर्व वॉर्डची चौकशी केली. रुग्णालयात आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांचे बंधू महारु फुलजी पाडवी उपचार घेत असल्याचे पाहून मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, “एक आमदारांचे भाऊसुद्धा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, यावरून सर्वसामान्यांसाठी या रुग्णालयांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट होते.”

*डाब प्राथमिक आरोग्य केंद्र*
डाब येथे भेट दिली असता, मंत्री श्री. आबिटकर यांनी सिकलसेल आजारावरील औषधांचा पुरवठा सर्वाधिक या रुग्णालयात करावा असे निर्देश दिले. कारण या भागात आदिवासी मुलांची वसतीगृहे असल्याने रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

*मोलगी ग्रामीण रुग्णालय*
मोलगी येथील रुग्णालयाची पाहणी करताना स्वच्छतेच्या बाबतीत झालेल्या त्रुटींवर त्यांनी गंभीर नाराजी व्यक्त केली. साफसफाई ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच आतापर्यंत झालेल्या वस्तू खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांना दिल्या.

*बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र*
बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीत मंत्री श्री. आबिटकर यांनी सर्पदंशावरील औषधांचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, कायमस्वरूपी अतिरिक्त साठा ठेवण्यात यावा असे निर्देश दिले.

 

*इतर भेटी*
याशिवाय मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुषा (ता. धडगाव) येथील तरंगता दवाखान्याची पाहणी करुन डोंगराळ व दुर्गम भागात बोट ॲम्युलन्सने पुरविल्या जाणाऱ्या आरोग्‍य सुविधा तत्पर कशा पुरविता येतील याबाबत निर्देश दिले.

या संपूर्ण दौऱ्यात आरोग्यमंत्री यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून रुग्णालयातील अडचणी समजावून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. “जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळवून देणे हीच सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा
Previous Post

सिकलसेल आजाराच्या नियंत्रणात सकारात्मक बदल घडवणार : प्रकाश आबिटकर

Next Post

श्रीगणेशा आरोग्याचा अभियान,जिल्ह्यात 17 हजारांहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी

Next Post
जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

श्रीगणेशा आरोग्याचा अभियान,जिल्ह्यात 17 हजारांहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add