नंदुरबार l प्रतिनिधी-
शहरातील असंख्य मुस्लिम समाजाच्या युवकांनी त्याचबरोबर काँग्रेसच्या 100 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला. संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर मुस्लिम युवक आणि काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रवेशामुळे शिंदे गटाला ताकद मिळणार आहे.
नंदुरबार शहरातील संजय टाऊन हॉलमध्ये विविध सहकारी संस्थांची सर्वसाधारण सभी निमित्त मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होती. त्यानंतर नंदुरबार शहरातील साधारणता 200 मुस्लिम समाजातील युवक आणि 100 पेक्षा अधिक काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘ छत्रपती शिवाजी महाराज की,जय’ अशा घोषणा देत असंख्य युवक दुपारी संजय टाऊन हॉलमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष परवेज खान यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. गणेश पराडके,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील,रमेश गावित,माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे,कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार सभापती दीपक मराठे, जि.प माजी सदस्य विजय पराडके, धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा,शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,जि.प माजी सदस्य विजय पराडके, जि.प सदस्य देवमन पवार,शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मोहितसिंग राजपूत, युवा सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय, रऊफ शेख आदी उपस्थित होते.