नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील विरल विहार येथे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानापासून आज १४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास मॅरेथॉन स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विजय महोत्सव क्रीडा समितीच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते मोहन खानवाणी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी असलेले खेळाडू शिक्षक क्रीडाशिक्षक उपस्थित होते.
ही मॅरेथॉन स्पर्धा दुपारी बारापर्यंत सुरू होती. या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांसाठी २१ किलोमीटर धावणे आणि मुलींसाठी १० किलोमीटर धावणे स्पर्धा होत्या. मॅरेथॉन स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम भगतसिंग वळवी द्वितीय पिंट्या वसावे आणि तृतीय दशरथ वसावे हे स्पर्धक विजयी झाले आहेत तर मुलींच्या गटात प्रथम शकीला वसावे द्वितीय मीना वसावे आणि तृतीय योगिता वळवी या स्पर्धक विजेत्या झाले आहेत. या सर्व विजेत्या स्पर्धकांना बाबा रिसॉर्ट या सभागृहात 15 ऑगस्ट रोजी सन्मानचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहेत.