Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजवर्धन कदमबांडे , शिरीषकुमार नाईक , चंद्रकांत रघुवंशी, राम रघुवंशी यांच्या सह ४७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

team by team
October 19, 2021
in राजकीय
0
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राजवर्धन कदमबांडे ,  शिरीषकुमार नाईक , चंद्रकांत रघुवंशी, राम रघुवंशी यांच्या सह ४७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याच्या राजकारणाला महत्वाचे स्थान असलेल्या
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि. १८ ऑक्टोंबर रोजी ४७ उमेदवारी  विविध गटातून अर्ज दाखल केले . त्यात विद्यमान चेअरमन राजवर्धन कदमबांडे , आमदार शिरीषकुमार नाईक , माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे . निवडणूक बिनविरोध करायची का महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढायची याचा निर्णय माघारीपर्यंत होण्याची शक्यता आहे.अर्ज दाखल करण्यासाठी २० ऑक्टोंबर रोजी शेवटची मुदत आहे .
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १७ जागासाठी  ही निवडणुक  होत आहे.२१ नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी दि. १८ ऑक्टोंबर रोजी गर्दी झाली होती . बँकेचे विद्यमान चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया संस्था गटातून दोन , माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व राम चंद्रकांत रघुवंशी यांनी वि . का . सहकारी संस्था गटातून अर्ज दाखल केला . काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी वि . का . सहकारी संस्था व इतर मागासवर्गातील जागेसाठी प्रत्येकी एक असे दोन भाजपचे प्रभाकर चव्हाण यांनी शिरपूर तालुक्यातून सहकारी संस्था गटातून चार , तळोदा तालुक्यातील भरत बबन माळी यांनी चार , इतर शेती संस्था गटातून अनिकेत विजय पाटील यांनी दोन , शहादा येथील दीपक पुरुषोत्तम पाटील , साक्री तालुका सहकारी संस्था गटातून हर्षवर्धन शिवाजी दहिते यांनी तीन , इतर शेती संस्था गटातून सुरेश रामराम पाटील , दर्यावगीर दौलतगीर महंत यांनी विमुक्त जाती , भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील गटातून साक्री तालुक्यातून चार , काँग्रेसचे डॉ . दरबारसिंग नारायणसिंग गिरासे यांनी याच गटातून अर्ज भरला . याशिवाय अक्कलकुवा तालुक्यात वि . का . सोसायटी गटातून आमशा फुलजी पाडवी यांनी दोन , सहकारी संस्था गटातून नवलनगरच्या शीलाबाई विजय पाटील यांनी महिला गट व वि . का . सोसायटी गटातून प्रत्येक एक असे दोन अर्ज , अनुसूचित जाती किंवा जमाती गटातून नवापूरचे शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक , नवापूर तालुक्यातील सहकारी संस्था गटातून अभिमन फुलसिंग वसावे , इतर शेती संस्थेतून धुळ्याचे चंद्रजित सुरेश पाटील , महिला गटासाठी कुसुंबा येथील कांचन चिमणराव पाटील यांनी दोन व इतर शेती संस्थेतून दोन असे चार अर्ज भरले . इतर शेती संस्थेतून धुळ्याचे डॉ . संजय तुकाराम पाटील , वि.का. सहकारी संस्थेसाठी कापडणे येथील भगवान विनायक पाटील , कृषी पणन संस्था व शेती माल प्रक्रिया संस्थेतून नंदुरबारचे अंकुश विक्रम पाटील , विमुक्ती जाती , भटक्या जमाती गटातून रनाळेचे सुरेश फकिरा शिंत्रे , महिला प्रतिनिधीसाठी रनाळेच्या हिरकणबाई बाबुराव पाटील , अक्राणीमहल तालुक्यातून सहकारी संस्थेसाठी संदीप मोहन वळवी , जहांगीर बाबा पाडवी , इतर मागासवर्गीय व इतर शेती संस्था गटासाठी प्रत्येक एक असे दोन , नंदुरबारचे दीपक प्रभाकर दिघे यांनीही अर्ज दाखल केला .आज ईदची सुट्टी , अर्ज प्रक्रिया बंद उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे . दरम्यान  मंगळवारी ईदची सुटी असल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद असेल . शेवटच्या दिवशी काही प्रमुख उमेदवारांकडून अर्ज दाखलची शक्यता आहे . माघारीसाठी दि.८ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे . निवडणूक बिनविरोध करायची का महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढायची याचा निर्णय माघारीपर्यंत होण्याची शक्यता आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या उपाध्यक्षपदी दिलीप बडगुजर यांची निवड

Next Post

वनपट्टे धारक व प्रलंबित वन दावेदार यांनाही अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई द्या : लोकसंघर्ष मोर्चाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add