नंदुरबार l प्रतिनिधी
हर घर तिरंगा अभियानांतर्गत आज गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या निवासस्थान येथून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
या तिरंगा रॅलीत माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, मोहन खानवाणी, पंकज पाठक, नंदुरबार शहराध्यक्ष भाजपा नरेश कांकरिया ,भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश चौधरी, भाजपा नेते राजेंद्र सोनार, सुमित सराफ, उमा चौधरी, सविता जयस्वाल, काजल मछले, सपना अग्रवाल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नंदुरबार शहरातील नागरिक विद्यार्थी शिक्षक शिक्षिका प्राध्यापक प्राध्यापिका आदि उपस्थित होते.
ही रॅली आमदार निवासस्थानी विरल विहार येथून मार्गस्थ होत डीआर हायस्कूल दीन दयाळ चौक डॉ अंधारे चौक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वज तिरंग्याचा महत्त्व अन जनजागृती संदर्भात संदेश देण्यात आला.