नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबारमधील सहा कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित व 2 कृषि सेवा केंद्राचे परवाने कायमचे रद्द, कृषि विभागाची कारवाई, निविष्ठा विक्रीत अनियमितता. खते, बियाणे व इतर निविष्ठा विक्री करतांना उपलब्धता आणि विक्री यात अनियमितता असल्याचे आढळुन आले. याशिवाय संबंधित खत विक्रते खतांची लिंकिंग करत असल्याचेही कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नंदुरबार जिल्हयात अशा सहा कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित तर 2 परवाने कायमचे रद्द करण्यात आले.
जिल्हयात युरिया तसेच मागणी असलेले खते मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे अशी खते देतांना जिल्हा पातळीवर मुख्य खत विक्रेत्यांसह तालुका गाव पातळीवरील खत बियाणे विक्रेते गरजेच्या खतासोबत अनावश्यक खते विक्री करुन लिंकींग करत असल्याचेही तक्रारी आहेत. वरिष्ठ पातळीवरुन तसेच कृषि मंत्र्यांनीही सातत्याने खत लिंकींगबाबत सांगुनही लिंकींग बंद होत नाही. खत विक्री व्यवहार नोंदी जादा दराने खत विक्री, खतांची लिंकींग असे प्रकार आढल्यास संबधीतांवर कृषि निविष्ठा विक्री कायदे व नियमानुसार कारवाई करण्याच्या सुचना करण्याचे आदेश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, चेतनकुमार ठाकरे यांनी दिलेल्या आहेत. शेतकरी बांधवाना युरिया व इतर खतांसोबत लिंकींग अथवा कृषि निविष्ठाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी असल्यास नजिकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 वर तसेच 9822446655 या व्हॉट्सअॅप नंबर वर तक्रार नोंदवावी.असे आवाहन किशोर ए. हडपे कृषि विकास अधिकारी, नंदुरबार यांनी केले आहे.