नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आ.स्व.बटेसिंहदादा रघुवंशी यांना नंदुरबार तालुका विधायक समितीच्या कोळदा येथील अनुदानित आश्रमशाळेत प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य शैलेंद्र एस.रघुवंशी यांनी बटेसिंहदादा रघुवंशी यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मुख्याध्यापक आय. एन. चौधरी यांच्यासह निलेश पाटील, राकेश पाटील, विनोद कुंभार, प्रफुल्ल चौधरी, मनिषा गावित, भावना जाधव, चेतना पाटील, जयश्री साळुंखे, भारती भामरे,हेमराज पाटील, शुभम परदेशी, भूषण शिंदे,ललित माळी, पंडित कोकणी, सुरेंद्र पवार, स्वप्नील सामुद्रे, संदीप पाटील, राजू अहिरे, दिनेश मराठे, आर.आर.शेख उपस्थित होते.यशस्वितेसाठी नंदकिशोर पाठक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार ललित माळी यांनी मानले.