नंदुरबार l प्रतिनिधी-
माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली महसूल सप्ताह व ग्राम संवाद अभियान अंतर्गत मौजे आराळे मंडळ, भाग रनाळे (ता. नंदुरबार) येथे पार पडलेल्या शिबिरात विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. प्रशासन लोकसेवेच्या दिशेने गतिमान झाले पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी त्यासाठी दक्ष असले पाहिजे. विविध दाखल्यांची वेळेवर पूर्तता म्हणजेच ग्राम विकासाला गती देणे होय; असे विचार या प्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले.
उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, तहसीलदार प्रदीप पवार, नायब तहसीलदार मदन कावळे (संजय गांधी विभाग), मंडळ अधिकारी श्रीमती कविता पचलुरे, गटविकास अधिकारी बिराडे, मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता प्रणव पाटील, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी मा. तडवी यांच्यासह कार्यक्रमात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्पन्न दाखले ४७, मृत्यू दाखले: १७, ग्रामपंचायत रहिवासी दाखले: ३२, डोमिसाईल सर्टिफिकेट: १४, जात प्रमाणपत्र: ७, सात बारा उतारे: ८७, फेरफार नोंदी: ४०, ८अ उतारे: ५६, विशेष सहाय्य योजनेसाठी DBT न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेटी देऊन आधार प्रमाणीकरण: ७, नवीन अर्ज स्वीकारणे: ५ याप्रमाणे शिबिरात दाखले प्रमाणपत्र व सेवा लाभ देण्यात आले.
आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तत्काळ मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा व तहसीलदार प्रदीप पवार यांनी देखील ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याबाबत सूचना दिल्या. महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती तलाठी जी.व्ही. जाधव यांनी दिली. कृषी योजनांची सविस्तर माहिती उप कृषी अधिकारी करणसिंग गिरासे यांनी दिली. आरोग्य विभागाच्या योजना तालुका वैद्यकीय अधिकारी तडवी यांनी समजावून सांगितल्या. पंचायत समितीच्या विकास योजना गटविकास अधिकारी बिराडे यांनी सादर केल्या.
या उपक्रमामुळे गावकऱ्यांना विविध शासकीय सेवा एका ठिकाणी व एका दिवसात मिळाल्या असून, नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.तलाठ गौरव जाधव (रनाळे), सुरेश मराठे (घोटाणे), श्रीमती रूपाली डोंगरदिवे (भादवड), श्रीमती अनिता साबळे (मांजरे), श्रीमती सपना चित्ते (कोपर्ली), श्रीमती पल्लवी कुलकर्णी (बह्याने), कृषी सहाय्यक प्रवीण शिंदे (आराळे), सचिन दराडे (मांजरे), अविनाश पिंपळे (कोपर्ली) आदींचा या शिबिरात सहभाग होता.