नंदुरबार l प्रतिनिधी
का. वि. प्र. संस्था संचलित श्रीमती क. पु .पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भालेर ता. नंदुरबार येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.भाबड , नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी माळके , रेवताडे , संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, भालेरच्या सरपंच सौ. के. सी. पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव भिका पाटील उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक पी. एस. सुर्यवंशी, पर्यवेक्षक पी. डी. पाटील यांनी केले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री.महाजन यांनी वृक्षांचे महत्त्व व पर्यावरण रक्षणाची गरज विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री माळके यांनी जगातील वृक्षांची घटती टक्केवारी आणि पर्यावरणावर होणारे परिणाम याविषयी माहिती दिली.
मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात विविध पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी “वृक्ष लावा – पर्यावरण वाचवा”, “हरित गाव – स्वच्छ गाव” अशा घोषणांद्वारे जनजागृती केली. वृक्षदिंडीच्या माध्यमातून गावातील नागरिकांनाही पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास डी. के. पाटील, हिरामण पाटील, वासुदेव पाटील, सुनील पाटील, रमेश पाटील, फकीरा पाटील, पी. पी. बागुल, दिनेश पाटील तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.