नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी काळात पर्यावरण रक्षणासाठी आणि प्रदूषणाचा लढा सामूहिक पद्धतीने प्रयत्न व्हावेत. केवळ शासनावर अवलंबून न राहता सामाजिक स्तरातून चळवळ उभी करावी लागेल असे प्रतिपादन पुणे येथील पर्यावरणवादी भारती बऱ्हाटे यांनी केले.
नंदुरबार येथील चौफाळे शिवारातील कृष्णा पार्क रिसॉर्ट येथे पर्यावरण संरक्षक समितीतर्फे आयोजित टाकाऊ पासून टिकाऊ कचऱ्याचे व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक मदनलाल जैन, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे श्री चौरे, पत्रकार योगेंद्र दोरकर, प्रहार संघटनेचे गोपाल गावित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी गोसावी यांनी तसेच परिचय सुलभा महिरे यांनी करून दिला. प्रमुख अतिथी व मान्यवरांचे पर्यावरण संरक्षण समितीतर्फे स्वागत करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना भारती-बराटे म्हणाल्या की, दैनंदिन जीवनात आणि सामाजिक क्षेत्रात पर्यावरणाला महत्त्व देणे आवश्यक आहे. यंत्ररूपी मानवाचे जीवनमान बदलत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातून सामूहिक प्रयत्न होत आहे. विद्यार्थ्यांसह पालकांपेक्षा शिक्षकांचे योगदान समाजात मोठे आहे. घर इमारत आणि सोसायटीच्या छतावर परसबाग निर्मितीला प्राधान्य द्यावे.
ज्याप्रमाणे नंदुरबारची लाल मिरची देशात प्रसिद्ध आहे. पुणे, महाबळेश्वर पेक्षा नंदुरबारला देखील उत्कृष्ट दर्जाची स्ट्रॉबेरी तयार होऊ शकते. पर्यावरण संरक्षक समितीने या उपक्रमाचे आयोजन कृष्णा पार्क रिसॉर्ट सारख्या निसर्गरम्य स्थळी ठेवल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे भारती बराटे यांनी नमूद केले.
ज्येष्ठ उद्योजक मदनलाल जैन यांनी देखील पर्यावरण संरक्षणासाठी स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागसेन पेंढारकर यांनी केले तर आभार महादू हिरणवाळे यांनी मानले.
कार्यक्रमाचे संयोजन योगेंद्र दोरकर, मनीषा दोरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी रवी गोसावी, सुलभा महिरे, नागसेन पेढारकर, वैभव करवंदकर, बी.डी. गोसावी, आणि पर्यावरण संरक्षण समितीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.