नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील नरेंद्र पुंडलिक महाले ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) या पदावर सन २०२४-२५ या वर्षात महसूल विभागाच्या विविध कामकाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरावरून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी,सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा (नंदुरबार) कृष्णकांत कनवारीया (शहादा) परिविक्षाधिन सनदी अधिकारी शिवांशु सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेश चौधरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) कल्पना ठुबे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, आदी. उपस्थित होते भालेर नरेंद्र पुंडलिक महाले ग्राम महसूल अधिकार भालेर यांची उत्कृष्ट शासकीय कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांनी नेमून दिलेल्या शासकीय काम वेळेत परिपूर्ण केले ई-पिक पाहणीचे कामकाज पुर्ण केलेले आहे. ७/१२ संगणकीरणाचे कामकाज १००% पुर्ण करुन घेतले आहे. कालबाह्य नोंदींचा निपटारा केलेला आहे. कलम १५५ दुरुस्ती, फेरफार नोंदी, मंडळ भागातील लसीकरण कामकाज मुदतीत पार पाडले आहे. आयत्या वेळेवर सोपविण्यात आलेली कामे हाताळण्यात आलेले आहे. तसेच तलाठी दप्तर तपासणीची कामे वेळेत पार पाडण्यात आलेली आहेत. अवैध गौणखनिज वाहतूक विरोधी पथकात कामकाज करुन कार्यवाही केली.