नंदुरबार l प्रतिनिधी
निवडणुकीला सामोर जातांना काय केले पाहिजे.संघटनात्मक बांधणी कशाप्रकारे केली पाहिजे.समजा आज निवडणुका लागल्या तर आपण निवडून येण्याची शाश्वती आहे काय व निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे. याबाबत शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब थोरात यांनी शिवसैनिकांना कानमंत्र देत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्ष कसा मोठा राहील यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करीत कामाला लागण्याचे आवाहन केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब थोरात उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, काल मंगळवारी जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयात घेण्यात आली.यावेळी शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व विधानसभा प्रमुखांनी गट व गणातील सद्य परिस्थितीकडे लक्ष द्यावे. निवडणुकीला सामोरे जातांना निवडणुका कशाप्रकारे लढवल्या गेल्या पाहिजे. बूथच्या याद्यांवर काम करीत असतांना सर्व बूथ प्रमुख नेमले आहेत की नाहीत. समजा काही बदल करायचे असेल तर पुढील दोन-चार दिवसात करावेत. निवडणुकीला सामोर जाताना काय केले पाहिजे आणि समजा आज निवडणुका लागल्या तर आपण निवडून येण्याची शाश्वती आहे काय व निवडून येण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे.
यावेळी जिल्हाप्रमुख गणेश पराडके,महिला आघाडी विभागीय समन्वयक सरिता माळी- कोल्हे, नंदुरबार जिल्हा महिला आघाडी संपर्कप्रमुख कविता गवंड, महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
निवडणुकीत शिवसेनाच पर्याय
प्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी म्हणाले, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी कार्यरत असून आज जिल्ह्यात शिवसेनेची स्थिती चांगली आहे. गतकाळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील शिवसेनेची ताकद दिसून आली. येणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के वाटा शिवसेनेचचा असेल. सर्वच ठिकाणी शिवसेनेच्या भगवा फडकवण्याच्या संकल्प शिवसैनिकांनी केलेला आहे. गत पंचवार्षिक जिल्हा परिषदेत ७ सदस्य शिवसेनेचे होते येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य निवडून दाखवू आणि जिल्हा परिषदेत अशी परिस्थिती निर्माण होईन की शिवसेने शिवाय इतर कुठल्याही पक्षाला पर्याय राहणार नाही.
यांनी सादर केला आढावा
आढावा बैठकीत सचिव भाऊसाहेब थोरात यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला तर नंदुरबार मतदार संघाच्या आढावा जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शहादा मतदारसंघ मनलेश जयस्वाल,नवापूर मतदारसंघ बकाराम गावित, तळोदा मतदार संघ अनुप उदासी यांनी सादर केला. बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.