Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शाळेत क्रीडा गणवेशचा नावाने होणारी पालकांची लूट थांबविण्याची हिंदु सेवा सहाय्य समितीची जिल्हाधिकारींकडे मागणी

team by team
July 21, 2025
in शैक्षणिक
0
शाळेत क्रीडा गणवेशचा नावाने होणारी पालकांची लूट थांबविण्याची हिंदु सेवा सहाय्य समितीची जिल्हाधिकारींकडे मागणी

शाळेत क्रीडा गणवेशचा नावाने होणारी पालकांची लूट थांबविण्याची हिंदु सेवा सहाय्य समितीची जिल्हाधिकारींकडे मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यात बहुतांश शाळा या विशिष्ट दुकानातूनच गणवेशासह शालेय वस्तू खरेदी करण्याची सक्ती करून पालकांची लूट करत असतात. आता दर शनिवारी क्रीडा गणवेशचा नावाने विद्यार्थ्यांसाठी पालकांना विशिष्ट दुकानावरून गणवेश घेण्याची सक्ती केली जात आहे व त्यातून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. यातून होणारी पालकांची लूट थांबवून त्या शैक्षणिक संस्थांची चौकशी करावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना हिंदु सेवा सहाय्य समितीकडून देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, दर शनिवारी आनंददायी शनिवार किंवा योगासने करण्यासाठी शाळेत क्रीडा गणवेशचा (स्पोर्ट्स ड्रेसचा) नावाने विशिष्ट दुकानातून ड्रेस खरेदी करण्यास तोंडी सांगतात. हा शालेय क्रीडा गणवेश (स्पोर्ट्स ड्रेस) ६०० ते ७०० रुपये पर्यंत मिळतो. वास्तविक पाहता या गणवेशाची गुणवत्ता बघता हा फक्त ३०० ते ३५० रुपये किमतीचा असेल परंतु शाळेच्या सिम्बॉल लावून त्याची दुपट किमतीने विक्री केली जाते. या सर्व प्रकारामध्ये शाळेचे संस्था चालक, शाळेचे कर्मचारी यांचीही मिलीभगत असते का? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालकांचे शाळेचा छुप्या शुल्कापोटी तर कधी गणवेश, स्पोर्ट्स ड्रेस, शालेय साहित्य पोटी हजारो रुपयांचे ओझे त्यांच्यावर येत आहे.तसेच शाळेला संगणक शासनाकडून उपलब्ध होत असूनही संगणक शुल्काचा नावे फी पालकांकडून वसूल केली जाते.

तरी वरिल तक्रारीची दखल घेऊन शैक्षणिक संस्थांची चौकशी करून पालकांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे. निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, संदीप राजपूत, उज्वल राजपूत यांनी दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना उबाठा पक्षाचा आंदोलन सप्ताहाचा नगरपालिकेसमोर करून समारोप

Next Post

डॉ. हिना गावित व डॉ. सुप्रिया गावित यांच्या पाठपुराव्याला यश; धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत इमारतींसाठी निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add