Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पद्य आणि घोषणांचा गजरात श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा 

team by team
June 10, 2025
in सामाजिक
0
पद्य आणि घोषणांचा गजरात श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा 

नंदुरबार l प्रतिनिधी-

तिथीप्रमाणे ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा पद्य आणि घोषणांचा गजरात भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित श्री शिवछत्रपती पालखीशोभायात्रा सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता मोठा मारुती मंदिरजवळ छ. शिवाजी महाराज यांचा मूर्तीचे दुधाभिषेक आणि पालखी पूजन प. पू. श्री सोमेश्वरानंदजी महाराज (राष्ट्रीय महामंत्री: शंभू पंच अग्नी आखाडा झाशी) यांच्या हस्ते करण्यात आले.

 


सर्वप्रथम संपूर्ण घोषणा आणि प्रेरणा मंत्र विनायक राजपूत याने म्हटले, तद्नंतर वेदमंत्र वेदमूर्ती रविंद्र पाठक गुरुजी यांनी म्हटले यावेळी संत श्री प. पू. सोमेश्वरानंदजी महाराज यांनी छ शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे दुग्धाभिषेक, जलाभिषेक आणि पूजन केले. पालखीमध्ये छ. शिवाजी महाराज यांची सिंहासनावर आरूढ मूर्ती पूजनासाठी ठेवण्यात आली होती. शोभायात्रेत सर्व प्रथम धर्मध्वज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, छ. शिवाजी महाराज वेशभूषेतील बालक पालखीसोबत आणि पाठीमागे सर्व शिवभक्त शोभायात्रेत घोषणा, पद्य म्हणत सहभागी झाले होते. मार्गात श्री शिवछत्रपती पालखीचे भाविकांनी पूजन आणि फुले उधळून स्वागत केले.

 

शोभायात्रा श्री मोठा मारुती मंदिर, नाटय मंदिर,मंगळ बाजार मार्गे शिवस्मारक या ठिकाणी संपन्न झाली. याठिकाणी रामराज्य, हिंदवी स्वराज्य ते हिंदुराष्ट्र हा प्रवास कसा झाला, कसा करायचा आहे हे आम्हाला छ. शिवाजी महाराज यांनी आपल्या कृतीतून शिकविले आहे शिवराज्याभिषेक दिनाचा या पवित्र दिवशी आपणही हिंदुराष्ट्र स्थापनेचा कार्यात कृतीशील होऊ या असे आवाहन धर्मसेवक नरेंद्र यांनी मनोगतातून व्यक्त केले. यानंतर छ. शिवाजी महाराज यांची आरती प पू सोमेश्वरानंदजी महाराज यांच्यासह शिवभक्त यांनी केली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजु चौधरी यांनी व्यक्त केले.

 

शोभायात्रा भावपूर्ण संपन्न होण्यासाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत,राजू चौधरी, जयेश भोई, सुयोग सूर्यवंशी, संदीप राजपूत, विजय जोशी, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत या धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

अंत्योदय व प्राधान्य कुंटूंब योजनेतील लाभार्थ्यांना,20 जून पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक

Next Post

संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

Next Post
संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

संकल्प ते सिध्दी' कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add