Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

team by team
June 5, 2025
in राज्य
0
कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

नंदुरबार l प्रतिनिधी-

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कमी खर्चाचे कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सी. के. ठाकरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राज्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून किंवा स्थानिक पातळीवर तयार केलेल्या चाळींमध्ये साठवतात, ज्यामुळे कांदा सडून मोठे नुकसान होते आणि कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर नकारात्मक परिणाम होतो. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची गुणवत्ता टिकून राहते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो, त्यामुळे कांदाचाळ उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कमी खर्चाच्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृहासाठीचे मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. 5 ते 25 मे.टन, 25-500 मे.टन आणि 500-1000 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळी/लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी क्षमतेनुसार अनुदान उपलब्ध आहे. प्रकल्पाचा खर्च रुपये 30 लाखापेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक असून, अर्थसहाय्य हे बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात देय राहील.

यासाठी पात्रता:
• शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक असून, सात/बारा उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद असणे अनिवार्य आहे.
• शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
• या योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था आणि सहकारी पणन संघ यांना घेता येईल.

इच्छुक शेतकऱ्यांनी काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कांदाचाळ/लसूण साठवणूक गृह या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘फलोत्पादन’ या घटकाखाली अर्ज सादर करावेत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉक्टर विजयकुमार गावित साधत आहेत गावागावात जनसंवाद

Next Post

पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Next Post
पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add