Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

team by team
May 30, 2025
in राजकीय
0
तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील तोरणमाळचा विकासासाठी गतिमान पाऊले उचलली जात आहेत. तोरणमाळचा प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल अशी माहिती बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. साधारणतः१०० कोटींच्या प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या विकासासाठी शिवसेना संपर्कप्रमुख तथा आ. चंद्रकांत रघुवंशी व आ.आमश्या पाडवी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. तोरणमाळचा विकास झाल्यास जिल्ह्यात स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. स्थानिक आदिवासींना त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल.गेल्या महिन्यात पर्यटन विभागाचे अधिकाऱ्यांनी तोरणमाळला भेट देऊन सर्वेक्षण केले होते.

गुजरात,मध्य प्रदेश राज्यसह नाशिक,पुणे, मुंबईतील पर्यटक देखील तोरणमाळला पर्यटनासाठी येत असतात.परंतु, आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने पर्यटकांच्या हिरमोड होतो.तोरणमाळचा विकासासाठी विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे बैठक घेण्याची विनंती केली होती.त्यानुसार,बुधवारी अधिकाऱ्यां समवेत बैठक झाली.यावेळी पर्यटन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आ.चंद्रकांत रघुवंशी व आ.आमश्या पाडवी यांनी होम स्टे, यशवंत तलावाचे खोलीकरण, पर्यटकांसाठी सुसज्ज विश्रामगृह, विविध व्यूह पॉईंटची रचना,बोटिंग, रोप वे आदी विकास कामे सुचविले. तोरणमाळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

भांडे संच वाटपाचा पुन्हा धडाका सुरू; माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाला शुभारंभ

Next Post

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

Next Post
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add