Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

team by team
May 15, 2025
in आरोग्य
0
डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

नंदुरबार l प्रतिनिधी-

डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे आणि डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नये, तसेच आवश्यक दक्षता बाळगून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डेंग्यू आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासांच्या चावण्यापासून होतो. या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.

 

डेंग्यूचे रुग्ण नियमित स्वरुपात आढळत असून डेंग्यू आजाराच्या संख्येत ऑगस्ट, सप्टेंबर नंतर वाढ होतांना दिसते. काही भागात अतिपाऊस,वाढते शहरीकरण, स्थलांतराचे प्रश्न, विविध विकास कामे अशा अनेक कारणामुळे डेग्यू आजाराचे प्रमाणात वाढ होते.

 

आजाराची लक्षणे
तीव्र डोकेदुखी, डौळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रीत काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत.

 

उपचार
डेंग्यूचा उपचार हा लक्षणांवर आधारीत असून डेंग्यूची लक्षणे आढळ्यास त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरु करावा.

 

उपाययोजना
डेंग्यू डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रितीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण शहरात व आपल्या गावात निश्चित कमी होईल. यासाठी घरातील पाणी साठविण्याचे सर्व भांडे आठवड्यातून किमान एकदा घासून पुसून कोडरी करावीत, पाण्याची सर्व भांडी हवाबंद झाकणाने कापडाने झाकावीत, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा, पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे,घरासभोवताली असणारे निरुपयोगी टायर, भंगार सामान, फुटक्या वस्तुंची विल्हेवाट लावावी, डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत, इमारतीच्या छतावर पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, पक्षी/जनवारे यांच्या पिण्याची भांडी स्वच्छ ठेवावी, घरातील कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा, गटारी वाहती करावीत आणि छोटे खड्डे व डबकी बुजवावीत, झोपतांना मच्छरदाणीचा, डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा, व अंगभर कपडे घालावेत, नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत.

 

 

डेंग्युबाबत लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावे. तसेच खाजगी लॅब धारकांनी डेंग्यू रुग्णांचे नमूने जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी. डेंग्यू या आजाराचे निश्चित निदानासाठी इलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी आहे. ही चाचणी जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातील सेन्टीनल सेन्टर येथे मोफत करण्यात येते, अशी माहिती श्री. सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रस्ताव सादर करावेत

Next Post

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

Next Post
कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

कोपर्ली येथील आर.सी .इंदानी विद्यालयात दहावीत अर्चना राऊळ प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add