Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

team by team
October 18, 2021
in आरोग्य
0
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरीता त्यांना  दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यास आपले प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले.
तळोदा तालुक्यातील बोरद येथील आरोग्यवर्धनी केंद्राच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन पालकमंत्री ॲड पाडवी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत  होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तहसिलदार गिरीष वखारे, जिल्हा साथरोग अधिकारी एन. एल. बावा, पंचायत समिती उपसभापती लता वळवी, जि.प. सदस्य सुहास नाईक, हेमलता शितोळे, सुनिता पवार, संगीता वळवी आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत असून येथील  नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतुन निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. कोरोना काळातही जिल्ह्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यात. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत हे प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्र उभारण्यात आले असून त्यावर 1 कोटी 81 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतीगृह, शस्त्रक्रीया कक्ष, औषध भांडार आदी सुविधा येथे उपलब्ध असतील, अशी  माहिती डॉ.चव्हाण यांनी यावेळी दिली.
प्रारंभी पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी आरोग्यवर्धनी केन्द्रातील विविध कक्षात जावून तेथील सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

दि.हस्ती बँकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहकर्जधारकांना अनुदान पत्राचे वाटप

Next Post

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते प्रतापपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

Next Post
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते प्रतापपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते प्रतापपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add