Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कारांची घोषणा, नंदुरबार येथील नूतनवर्षा वळवी व सुषमा शाह यांचा होणार सत्कार

team by team
April 7, 2025
in शैक्षणिक
0
नाशिक विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कारांची घोषणा, नंदुरबार येथील नूतनवर्षा वळवी व सुषमा शाह यांचा होणार सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

नाशिक विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी नंदुरबार येथील जगदिश पाटील व युवराज पाटील तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी येथील मुख्याध्यापक सुषमा शाह व नूतनवर्षा वळवी यांची निवड करण्यात आली आहे. रविवार ६ एप्रिल रोजी जळगांव येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

 

महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्यावतीने यावर्षी नाशिक विभागातील आदर्श क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीपासून विभागातील त्या-त्या जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रास सतत सहकार्य करणारे व योगदान देणारे मुख्याध्यापक यांनाही या पुरस्कारात समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन जळगाव जिल्ह्यास मिळाले आहे.

 

पुरस्कार विजेत्यांमध्ये नाशिक-आदर्श मुख्याध्यापक संजय चव्हाण (जुहरमल सरूपचंद रुंगठा हायस्कूल, अशोकस्तंभ, नाशिक), क्रीडा शिक्षक किशोर राजगुरू (लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक), राजाराम पोटे (मराठा हायस्कूल, शिवाजीनगर, नाशिक), धुळे मुख्याध्यापक संजय पवार (राजीव गांधी माध्यमिक विद्यालय, धुळे), फादर जॉय व्हेटोली सी एम आय (चावरा हायस्कूल, धुळे), क्रीडा शिक्षक डॉ.भूपेंद्र मालपुरे (जो.रा.सिटी व द.मा.बारी कनिष्ठ महाविद्यालय, धुळे), विजय एकनाथ सिसोदे (एच.आर. पटेल कन्या व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरपूर, धुळे), जळगाव मुख्याध्यापक लक्ष्मण तायडे (भाऊसाहेब राऊत विद्यालय, जळगाव), चंद्रशेखर पाटील (बी.यू.एन. रायसोनी विद्यालय, जळगाव), क्रीडा शिक्षक निलेश पाटील (जयदुर्गा माध्यमिक विद्यालय, मेहरून), योगेश सोनवणे (बी.यू.एन. रायसोनी विद्यालय, जळगाव), प्रविण पाटील (खुबचंद सागरमल विद्यालय, जळगाव), नंदुरबार-मुख्याध्यापक सुषमा शाह (श्रीमती ही.गो. श्रॉफ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नंदुरबार), नूतनवर्षा वळवी (एस.ए. मिशन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नंदुरबार), क्रीडा शिक्षक युवराज पाटील (कुबेर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, म्हसावद), जगदीश बच्छाव (श्रीमती डी.आर. हायस्कूल, नंदुरबार) यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

 

विभागीय पुरस्कार निवड समितीत प्रशांत कोल्हे (विभागीय अध्यक्ष, जळगाव), डॉ.आनंद पवार (विभागीय सचिव, धुळे), संजय पाटील (नाशिक), सुनिल सूर्यवंशी (नंदुरबार) यांचा समावेश आहे. हा पुरस्कार सोहळा विभागातील गुणवंत क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या अथक परिश्रमांना दिलेली आदरांजली आहे. या सोहळ्यात सर्व मान्यवर, क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे घरोघरी जाऊन नागरिकांना महाकुंभ जलकलशाच्या गंगाजल तीर्थाचे वाटप

Next Post

नाशिक विभागीय आदर्श मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण

Next Post
नाशिक विभागीय आदर्श मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण

नाशिक विभागीय आदर्श मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add