नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नांदवन भागात विकासाच्या नावावर एमआयडीसी मार्फत जबरजस्तीने शेतकऱ्यांची जमिनी हिसकवणे सुरूआहे. जमीन अधिग्रहण नसताना शेतकऱ्यांच्या जमिनीवर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.याबाबत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.
नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम अर्थात एमआयडीसीचे काम सुरू आहे यासाठी एमआयडीसी मार्फत जमीन अधिग्रहांनाचे काम सुरू आहे परंतु काही भागात जमीन अधिग्रहण केलेली नसताना जबरदस्तीने एमआयडीसी कडून तेथे काम करण्यात येत आहे. एमआयडीसी मार्फत सुरू असलेला कामाला विरोध दर्शवत आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी आयोजित बैठकीत प्रांत अधिकारी अंजली शर्मा,
सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम. आर. टी. गावित ,कॉम विक्रम गावित,कॉम शितल गावित,कॉम गोबजी गावित, डॉ राजेश गावित, इब्राम गावित , लाजरस गावित, हिरमा गावित, प्रशांत गावित, रमेश गावित, सुनिता गावित ,सैदान गावित उपस्थित होते.
नवापूर तालुक्यातील नांदवन भागात विकासाच्या नावावर एमआयडीसी मार्फत जबरजस्तीने शेतकऱ्यांची जमिनी हिसकवणे सुरूआहे. जमीन अधिग्रहण नसताना शेतकऱ्यांच्या जमिनीवर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.याबाबत अनेकदा तक्रार देऊन सुद्धा नवापूर तहसीलदार , एमआयडीसी चे अधिकारी ,ठेकेदर इंजिनियर यांनी जबरजस्तीने काम सुरु केलं . गावकऱ्यांनी विरोध करायला नको यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एमआयडीसीसाठी जमीन अधिग्रहण दुसऱ्या जागेवर असून आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीमधून हे काम करण्यात येत आहे या संदर्भात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक शेतकरी सभा च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची माहिती दिली यावेळी जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी संपूर्ण माहिती घेऊन एमआयडीसीच्या कामाला स्थगिती दिली आहे व या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला स्थगिती दिली आहे.
परंतु यानंतरही काम सुरू झाले तर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व या सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील असे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सांगण्यात आले आहे .