नंदुरबार l प्रतिनिधी-
शिंदगव्हान ता.नंदुरबार येथे जागतिक महिला दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद शाळा शिंदगव्हान येथे नंदुरबार येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. वृषाली पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत महिला दिवस साजरा करण्यात आला.यावेळी डॉ. वृषाली पाटील, सरपंच विद्या पाटील, उपसरपंच मंगला पाटील, मुख्याध्यापिका शालिनी पाटील, मीना पाटील निर्मला पाटील आदी उपस्थित होत्या. शिदगव्हाण ग्रामपंचायतीतर्फे महिला दिवस निमित्त स्त्रीरोग तज्ञ डॉ. वृषाली पाटील यांचे स्त्रियांना मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन येथील राम मंदिरात करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम विस्तार अधिकारी किशोर शिरसाट यांनी केले. डॉ. पाटील यांनी स्त्रियांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध समस्याचे निराकरण व उपाय यावर मार्गदर्शन केले व स्त्रियांची समस्या बाबत चर्चा केली.
कार्यक्रमास सरपंच विद्या पाटील, उपसरपंच मंगला पाटील, मुख्याध्यापिका शालिनी पाटील, मीना पाटील, निर्मला पाटील, मंगल पाटील, वैशाली भिल, शिला पाटील, माध्यमिक शाळेच्या शिक्षिका रूपाली जावरे व सपना पाटील, बचत गट अध्यक्ष कविता पाटील आदी सह गावातील महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या.