नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.
आमच्या क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी माता पालक यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून कमलबाई धनगर उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींनी कर्तुत्वान महिला यांच्या वेशभूषा केलेल्या होत्या त्यात सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई ,मदर तेरेसा इत्यादी कर्तुत्वान महिला यांच्या कार्याची ओळख करून दिली.
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व या विषयावर नाटिका सादर केली त्यातून शिक्षण किती मोलाचे आहे याची ओळख करून दिली. ज्येष्ठशिक्षिका सी.व्ही. पाटील , एस.पी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून कर्तुत्वानमहिलांच्या कार्याची ओळख करून दिली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, प्राचार्या विद्या.बी. चव्हाण यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एन.पाटील व श्रीमती एम.आर .पाटील यांनी केले. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सौ.ए.एस. मगर यांनी केले. पर्यवेक्षक एम. बी. अहिरे, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.