नंदुरबार l प्रतिनिधी
भादवड ता. नंदुरबार येथील विद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा. नं. ता. वि. समिती संचलित श्री. छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष महिला शिक्षिका श्रीमती सी.एच.वाघ व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका श्रीमती व्ही. के. गिरासे व विद्यालयातील स्वयंपाकीन मावशी यांनी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.
सुरुवातीला विद्यालयातील महिला शिक्षिका व स्वयंपाकीन मावशी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले महिला दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थिनींनी विविध रांगोळ्यांद्वारे स्त्रियांबद्दल जनजागृती व त्यांच्या कार्याचा आढावा मांडला विद्यालयातील बहुसंख्या विद्यार्थिनींनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांवर आधारित चारोळ्या व कविता आकर्षक रित्या पोस्टर द्वारा साकारून विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले