नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर, नगाव, तिसी, वडवद ता. नंदुरबार येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन इमारतीची भूमिपूजन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
विविध कार्य सोसायटीची स्थापना १५-६-२३ साली करण्यात आली. सोसायटीची इमारत १९७४-७५ साली बांधण्यात आली.
इमारत जीर्ण झाल्याने याच ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता तो प्रस्ताव मंजूर होऊन सहाय्यक निबंध कार्यालयामार्फत नवीन इमारत बांधण्यासाठी १६ लाख ४४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला .
कार्यक्रमास शेतकी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील नंदुरबार तालुका विधायक समितीचे सचिव यशवंत पाटील माजी जि. प. अध्यक्ष वकील पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, उपसरपंच गजानन पाटील, तिसीचे लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील,विविध कार्य सोसायटीचे चेअरमन संतोष पांडुरंग पाटील व उप चेअरमन पोपट दयाराम पाटील, हिम्मतराव पाटील ,प्रकाश पाटील, नाना पाटील ,युवराज पाटील, सोसायटीचे सचिव रफिक खाटीक, सुभाष पाटील जिजाबराव पाटील ,देविदास पाटील राजकमल पाटील आदीसह भालेर, नगाव, तिसी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.